swiggy twitter
Sports

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान कंडोमची रेकॉर्डब्रेक विक्री, Swiggyची मजेशीर पोस्ट व्हायरल

Swiggy On IND vs PAK Match: या सामन्यानंतर स्विगीचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Swiggy Tweet On IND vs PAK Match:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. संपुर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागून होतं.

दरम्यान हा सामना सुरू असताना प्रसिद्ध ऑनलाईन फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीवर ३५०९ कंडोम ऑर्डर करण्यात आले आहेत. ही माहिती स्विगीने ट्विट करत दिली आहे.

या सामन्यानंतर त्यांनी केलेलं मजेशीर ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतंय. त्यांनी आपल्या ट्विटला मजेशीर कॅप्शन दिलं आहे. हे ट्विट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.

भारताचा दणदणीत विजय..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव १९१ धावांवर संपुष्टात आला. (Latest sports updates)

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्माने ६३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ८६ धावा चोपल्या. तर श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई -गोवा महामार्गावर सलग 5 व्या दिवशी वाहतूक कोंडी, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Central Government: मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, ती एक मागणी मान्य, UPS, NPS मध्ये केले बदल

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, PSI बदने अन् बनकरबाबत धक्कादायक माहिती

Accident: पालघरमध्ये मध्यरात्री अपघाताचा थरार, रुग्णवाहिकेने तिघांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू

Hit And Run : प्रसिद्ध अभिनेत्रीनं दुचाकीला ठोकलं अन् घटनास्थळावरून पळाली; अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT