IPL वर सट्टा लावणाऱ्या 3 बुकींना अटक; ७लाखांची रोकड जप्त! प्रदीप भणगे
Sports

IPL वर सट्टा लावणाऱ्या 3 बुकींना अटक; ७ लाखांची रोकड जप्त!

आयपीएल स्पर्धेतील मॅचवर सट्टा घेणाऱ्या 3 बुकींना लोढा पलावा येथून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सिमकार्ड असणारे 6 आणि सिमकार्ड नसलेल्या 17 मोबाईलसह 7 लाख 65 हजारांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली  : आयपीएल (IPL) अर्थातच इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेतील मॅचवर सट्टा घेणाऱ्या 3 बुकींना लोढा पलावा येथून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सिमकार्ड असणारे 6 आणि सिमकार्ड नसलेल्या 17 मोबाईलसह 7 लाख 65 हजारांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे. लोढा पलावाच्या कॅसारिओ गोल्ड सोसायटीत काही इसम आयपीएलवर बेकायदेशीररित्या सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हे देखील पहा :

आयपीएलमधील सनराईजर्स हैद्राबाद (Sunrisers Haidrabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) संघाच्या क्रिकेट (Ctricket) मॅचवर हा सट्टा घेण्यात येत होता. त्याचवेळी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून रितेश कुवरप्रकाश श्रीवास्तव, कुणाल बबनराव दापोडकर आणि निखिल फुलचंद चौरसिया या तिघा बुकीं ऑपरेटरला ताब्यात घेतले. त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा तसेच भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी याबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

ही कारवाई कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे, वडणे, पोलीस हवालदार संजय पाटील, देवरे, पोलीस शिपाई ऋषीकेश भालेराव, बडगुजर, पोलीस नाईक लोखंडे, कुरणे आदींच्या पथकाने केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT