Abhishek Sharma Saam TV Marathi
Sports

Abhishek Sharma : १० षटकार, १० चौकार अन् २०० चा स्ट्राईक रेट; अभिषेकच्या शतकी तडाख्यात दिल्ली उद्ध्वस्त

Abhishek Sharma IPL stats : अभिषेक शर्माच्या वादळी १३५ धावांमुळे दिल्ली उद्ध्वस्त झाली. अभिषेकने ६८ चेंडूत १० षटकार, १० चौकार, २०० स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. अभिषेकने फक्त ४७ चेंडूत शतक ठोकत ऑरेंज कॅपवर कब्जा केला.

Namdeo Kumbhar

Abhishek Sharma 135 runs 68 balls 10 sixes 10 fours : अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीसमोर दिल्लीची भेदक गोलंदाजी दुबळी दिसत होती. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण अभिषेक शर्माच्या वादळात दिल्ली भुईसपाट झाली. अभिषेक शर्माने पहिल्या चेंडूपासूनच दिल्लीच्या गोलंदाजांची पिटाई केली. अभिषेक शर्माने फक्त ४७ चेंडूत शतक ठोकले. १५ व्या षटकातील पहिल्या २ चेंडूवर लागोपाठ षटकार ठोकत अभिषेक शर्माने शतकाला गवसणी घातली. अभिषेक शर्माच्या वादळी शतकाच्या जोरावर हैदराबादने २० षटकात २ विकेटच्या मोबदल्यात २४२ धावांचा डोंगर उभारला. अभिषेकने हेड, इशान किशन आणि क्लासेनसोबत वादळी फलंदाजी केली.

अभिषेकचे वादळी शतक -

अभिषेक शर्मा याने ६८ चेंडूत १३५ धावांची वादळी खेळी केली. अभिषेकने १० चौकार आणि १० षटकारांचा पाऊस पाडला. अभिषेक शर्माने २०० च्या स्ट्राईक रेटने दिल्लीची गोलंदाजी फोडून काढली. या शतकी खेळीसह अभिषेक शर्माने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. त्याने ७ सामन्यात ३२३ धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये २७ षटकार २४ चौकारांचा समावेश आहे. अभिषेक शर्माने यंदाच्या हंगामात एक शतक आणि २ अर्धशतके ठोकली आहेत.

क्लासेनचा फिनिशिंग टच -

ट्रेव्हिस हेड यानं २६ चेंडूमध्ये ३७ धावांची छोटेखानी खेळी केली. याखेळीत त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावले. तर कर्णधार इशान किशन याने १३ चेंडूत २५ धावांची भर घातली. त्याने एक षटकार आणि २ चौकार लगावले. अखेरच्या काही षटकात क्लासेन आणि शर्मा यांनी गोलंदाजाचे वाभाडे काढले. क्लासेन याने २८५ च्या स्टाईकरेटने धावांचा पाऊस पाडला. क्लासेन याने १३ चेंडूमध्ये ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३७ धावांचा पाऊस पाडला.

दिल्लीचे गोलंदाज फ्लॉप -

अभिषेक शर्माच्या वादळामुळे दिल्लीची गोलंदाज ढेपाळले. एकाही गोलंदाजाला अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही. धक्कादायक म्हणजे दिल्लीच्या एकाही गोलंदाची सरासरी १० च्या खाली नाही. फक्त अक्षर पटेल यालाच एक विकेट घेता आली, इतर स्व गोलंदाज फ्लॉप ठरले. लुंगी एनगिडी याच्या ४ षटकात दिल्लीने ४१ धावा वसूल केल्या. तर नितीश राणाच्या ४ षटकात ५५ धावा निघाल्या. अक्षर पटेल याने २ षटकात ३३ धावांच्या मोबदल्यात २ विकेट घेतल्या. मुकेश कुमार, टी नटराजन, एनगिडी यांच्यासह दिग्गज गोलंदाज सुपरफ्लॉप झाले. एकाही गोलंजाला अभिषेक शर्माला रोखता आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी; संतापलेल्या महिलेनं थेट गिरीश महाजनांना सुनावलं| Video

फिश पॉलिटिक्स! मासे ठरवणार पश्चिम बंगालचा निकाल, Explained

पुण्यात टँकर माफियांचा सुळसुळाट, साम इन्व्हेस्टिगेशनमध्ये टँकर माफियांचा भांडाफोड

Maharashtra News Live Update: लातूरच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह गारपीट

'दादांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका', बारामतीकरांसमोर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT