क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणूनच या खेळाला अनिश्निततेचा खेळ म्हणतात. कोणता संघ कुठल्याही स्थितीतून कमबॅक करु शकतो. तर कुठला संघ मजबूत स्थितीत असूनही पराभूत होऊ शकतो.
ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामन्यातही असाच काहीसा प्रकार घडला, ज्यावर कोणाचाही विश्वास बसणं कठीण आहे. या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर ड्रामा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामना साऊथ ऑस्ट्रेलिया आणि तास्मानिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात तास्मानियाला जिंकण्यासाठी ४२९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग तास्मानियाने पूर्ण जोर लावला.
या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर तास्मानियाला जिंकण्यासाठी ४ धावा करायच्या होत्या. तर १ विकेट शिल्लक होती. १ चेंडू, ४ धावा आणि १ विकेट शिल्लक असं समीकरण या संघासमोर होतं.
जिंकण्यासाठी ४ धावा आणि सामना ड्रॉ करण्यासाठी तो चेंडू खेळून काढायचा होता. ऑस्ट्रेलियाकडून वेस एगर गोलंदाजी करत होता. त्याने यॉर्कर चेंडू टाकला. या चेंडूवर रिली मेरेडिथने डिप कव्हरच्या दिशेने फटका मारला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र चेंडू तोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातात होता. हे पाहताच फलंदाजाने नॉन स्टायकर एंडला धावत असलेल्या फलंदाजाला माघारी परतण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने काही ऐकलं नाही. तो माघारी जाणार त्यापूर्वीच तो धावबाद झाला. त्यामुळे तस्मानियासोबत, तेलही गेलं आणि तुपही गेलं...असाच काहीसा प्रकार घडला. साऊथ ऑस्ट्रेलियाने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना साऊथ ऑस्ट्रेलियाने ६ गडी बाद ३९८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना, तास्मानियाला २०३ धावा करता आल्या.
पहिल्या डावात साऊथ ऑस्ट्रेलियाने १९५ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या साऊथ ऑस्ट्रेलियाने २३३ धावांवर डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना तस्मानियाचा संघ २ धावा दुर राहिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.