Grah Gochar Saam Tv
आध्यात्मिक

Grah Gochar: १ मे पासून 'या' राशींचं पलटणार नशीब; मेषमधील सूर्य-शुक्राच्या युतीमुळे मिटतील अडचणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Grah Gochar: इंग्रजी कॅलेंडरच्या पाचव्या महिन्यात मे २०२४ मध्ये ५ राशींचे नशीब चमकणार आहे. व्यवसाय, नोकरी आणि लव्ह लाईफमध्ये या ५ राशींसाठी मे महिना चांगला जाणार आहे. १ मे च्या रात्री गुरू मेष राशीतून वृषभ राशीत जाणार आहे. तर मेष राशीमध्ये सूर्य आणि दैत्य स्वामी शुक्र याची युती होणार असून याचा फायदा ५ राशींना होणार आहे.

मेष

या राशीच्या लोकांचा वेळ व्यस्त असेल, ज्यामुळे त्यांच्यासाठी पैशाचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचे कामे अडकली असतील त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. कोर्टात अडकलेल्या प्रकरणांमध्ये विरोधक पराभूत होतील. बेरोजगारांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जमीन आणि घरांच्या खरेदी-विक्रीमध्ये गुंतलेल्या लोकांना चांगला नफा मिळेल.

वृषभ

या राशीमधील ज्या लोकांनी भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या व्यवसायात भागीदारांचे पूर्ण सहकार्य मिळेल. दोघांच्या सहमतीने व्यवसायात प्रगती होत उत्पन्न वाढण्याचे योग या काळात आहेत. सिनेमा आणि टीव्ही मालिकांच्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या लोकांना नवीन ओळख मिळण्याची शक्यता आहे. जे छोटे व्यवसायिक आहेत, त्यांना कर्ज मिळल्यास त्यांचा व्यवसाय भरभराटीला येईल. महिला उद्योजकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह

या राशीच्या लोकांना सर्व प्रकारचे भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे. या राशीमधील काहीजण घर आणि वाहन खरेदी करू शकतात. विद्यार्थी त्यांच्या करिअरमध्ये योग्य स्थान प्राप्त करतील. काहींना चांगल्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे. या राशीमधील लोकांचा अनावश्यक खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल, ज्यामुळे आर्थिक स्थिरता मिळेल. बँक बॅलन्स सुधरेल. सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे कौटुंबिक नात्यात प्रेम वाढेल. नवीन नातेसंबंध तयार होतील, आरोग्य उत्तम राहील.

तूळ

या राशीच्या लोकांसाठी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सूर्य-शुक्र संयोगाचा प्रभाव दिसून येईल. अनेकांची बिघडलेली कामेही पूर्ण होतील. तुमचे विरोधक तुमच्याकडून प्रत्येक आघाडीवर पराभूत होतील. या राशीतील काही लोकांच्या संपत्तीचा ओघ वाढेल, एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसा येण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवास सुखकर आणि लाभदायक असेल. ज्या लोकांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, व्यवसायात प्रगती झाल्यामुळे त्यांचा सन्मान वाढेल. राजकारणाशी संबंधित लोक आपले ध्येय साध्य करतील.

मीन

या राशीच्या लोकांसाठीही काळ फार महत्त्वाचा असेल. या राशीमधील अनेकांचे दुःखाचे दिवस निघून जाणार आहेत. सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगामुळे शुभयोगाची शक्यता निर्माण झालीय. यश तुमच्याकडे चालत येणार आहे. कोणतेही कामे काळजीपूर्वक विचार केल्यास ते सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. अनेकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता या काळात आहे. ज्या महिला शिक्षणाच्या व्यवसायात आहेत त्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांनी प्रसिद्धी देखील मिळेल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT