Guru-Budh Yuti 2024 saam Tv
आध्यात्मिक

Guru-Budh Yuti 2024 : गुरू आणि बुधची युती, या राशींच्या लोकांची आर्थिक चणचण होणार दूर

Guru-Budh Yuti 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धीची देवता म्हटले जाते. तर गुरुला भाग्याची देवता म्हटले आहे. गुरू आणि बुध एकत्र येतात तेव्हा शुभ परिणाम प्राप्त होतात. बुध आणि गुरूच्या संयोगाने कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Guru-Budh Yuti 2024 :

ज्योतिषांच्या मते काही दिवसांनी ग्रहांचा बुध आपली राशी बदलणार आहे. भगवान बुध सध्या मीन राशीमध्ये विराजमान आहे. होळी संपताच बुध ग्रह आपली राशी बदलणारा पहिला ग्रह असेल. ज्योतिषांच्या मते बुध २६ मार्चला मेष राशीत प्रवेश करेल. गुरू आधीच मेष राशीत आहे. त्यामुळे २६ मार्च रोजी मेष राशीमध्ये बुध आणि गुरूचा संयोग होईल. बुध आणि गुरूचा संयोग सुमारे १२ वर्षांनी मेष राशीमध्ये तयार होणार आहे. या दोन ग्रहांच्या संयोगामुळे काही राशींचे नशीब पालटणार आहे. (Latest News)

सिंह

मेष राशीत गुरू आणि बुध यांचा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. दोन्ही ग्रहांच्या संगतीच्या आशीर्वादामुळे नोकरीत मान-प्रतिष्ठा वाढेल. कमाईचे नवीन स्रोत निर्माण होतील. परंतु तुमच्या जोडीदाराला किरकोळ आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पण तुम्ही ते सहज सोडवू शकाल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी गुरू आणि बुध यांचा संयोग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. धनु राशीच्या लोकांवर बुध ग्रहाची कृपा राहणार आहे. ज्यामुळे या राशीच्या लोकांच्या बुद्धीचा विकास होईल. एप्रिलच्या सुरुवातीला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते

कर्क

या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि बुध यांचा संयोग लाभदायक ठरेल. दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात विस्तार करता येईल. धार्मिक कार्यात रुची राहील. तुम्ही घरी काही धार्मिक कार्यक्रमही आयोजित करू शकता. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. ज्योतिषांच्या मते ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे त्यांना फायदा होईल.

डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रीय श्रद्धेवर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली आहे. साम टीव्ही या गोष्टीला दुजोरा देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते ऍड मंगेश ससाणेयांच्या गाडीवर बीड माजलगाव मध्ये हल्ला

Education Department : शिक्षण विभागाची मोठी कारवाई, मुंबईतील २ दिग्गज शाळांची मान्यता रद्द

Mahindra Scorpio N: कार खरेदीचा प्लॅन आहे? थांबा! Mahindra Scorpio N Facelift लवकरच येणार; जाणून घ्या फीचर्स, किंमत

Badlapur : बदलापूर स्टेशनवर राडा, जोधपूर एक्सप्रेस प्रवाशांनी रोखली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

मालाडमध्ये २५ लाखांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT