Budh Gochar 2024: saam tv
आध्यात्मिक

Budh Gochar: एक जुलैपासून बुध करणार पुष्य नक्षत्रात प्रवेश; ५ राशींचं चमकणार नशीब

Budh Gochar 2024: बुध हा शुभ ग्रह 1 जुलै रोजी पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्यांच्या नक्षत्रातील या बदलाचा 5 राशींवर खूप सकारात्मक प्रभाव पडू शकतो. चला जाणून घेऊया, या राशी कोणत्या आहेत आणि या राशींच्या लोकांच्या जीवनात कोणते बदल होतील?

Bharat Jadhav

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा शुभ आणि लाभदायक ग्रह मानला जातो. बुधाच्या राशीचक्र बदलाचाच नव्हे तर नक्षत्र बदलाचा देश, जग, हवामान, निसर्ग आणि सर्व राशींवर व्यापक प्रभाव पडत असतो. सोमवार, 1 जुलै 2024 रोजी सकाळी 8:39 वाजता, बुध पुनर्वसु नक्षत्र सोडून पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे. सर्व राशींवर त्याचा परिणाम होणार असला तरी 5 ​​राशींवर त्याचा विशेष सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या 5 राशी कोणत्या आहेत? हे जाणून घेऊ.

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाचे महत्त्व

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, वाणी, संवाद, व्यवसाय, शिक्षणाचा कारक आहे. कुंडलीतील बलवान बुध ग्रह व्यक्तीला चांगली स्मरणशक्ती, तीक्ष्ण मन, विश्लेषण क्षमता आणि बहुमुखी प्रतिभा देत असतो. व्यक्तीच्या जीवनात विनोद आणि सर्जनशीलतेची भावनादेखील बुध ग्रहामुळे वाढत असते. त्यामुळे बुध हा शुभ आणि लाभदायक ग्रह मानला जातो.

पुष्य नक्षत्रात बुध संक्रमणाचा राशींवर प्रभाव

मेष

या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. सर्जनशील कार्यातून तुमची नवीन ओळख निर्माण होईल. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना आर्थिक लाभ होईल. तुमच्या जोडीदाराच्या मदतीने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंद मिळेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्यांसह पदोन्नती मिळू शकते. जे कोणी आजारी आहेत त्यांना आजारातून आराम मिळेल. तसेच त्यांचे मन प्रसन्न राहील.

मिथुन

या राशीतील काही व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात नवी चमक येईल. बोलण्यात उल्लेखनीय सुधारणा होईल. पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात अनेकांना यश मिळेल. व्यवसाय आणि नोकरीत अनेकांना लाभ होईल. तर या राशीतील काही लोक बिझनेस ट्रिपवर जाऊ शक्यता. ही ट्रीप त्यांना लाभदायक ठरले. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच या राशीतील जातकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

तूळ

या राशीतील लोकांसाठी आनंदाची काळ असणार आहे. या राशीतील जातकांची आर्थिक अडचण दूर होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळाल्याने पैशाबद्दलची चिंता कमी होईल. तर विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. सामाजिक कार्यात जे जातक सक्रिय सहभाग घेतील त्यांचा आदर वाढेल. तर त्यांना आर्थिक लाभही मिळेल. आरोग्य चांगले राहील. नोकरदार लोकांना पुरस्कार किंवा सन्मान मिळू शकतात. वैवाहिक जीवनातही त्यांचा आनंद वाढेल.

धनु

या राशीच्या जातकांसाठी ही बुध ग्रहाचे संक्रमण चांगले असेल. या राशीतील जे लोक बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. कर्जापासून मुक्ती मिळू शकते. चांगल्या कामांमुळे अनेकांचा सामाजिक सन्मान मिळेल. गुप्त शत्रूंवर विजय मिळेल. तर काही जण परदेश दौऱ्यावर जाऊ शकतात. जीवनसाथीसोबतचे संबंध सुधारतील. प्रेम जीवन आनंदी राहतील.

कुंभ

या राशीतील लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळू शकेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. पैसे कमावण्यात यश मिळेल. अनेकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापूर स्पेशल! CSMT ते कोल्हापूर दरम्यानचा प्रवास होणार अतिजलद; जाणून घ्या किती असेल रेल्वे तिकीट, अन् थांबे

Maharashtra Live News Update: नांदेडचे रामभक्त निघाले सायकलवर अयोध्येला

Olya Naralachi Vadi Recipe: गूळ घालून बनवा ओल्या नारळाच्या वड्या, फक्त 10 मिनिटांत होईल रेसिपी

Manoj Jarange Patil:मराठा आणि ओबीसी दंगल घडवण्याचा खटाटोप सुरू; मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Rahul Gandhi : जनता काँग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे मागतंय, म्हणून निवडणूक आयोगानं...; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT