आध्यात्मिक

Rashi : एप्रिल सुरू होताच बुध आणि शुक्र तयार करतील ‘लक्ष्मी नारायण योग’; 'या' ३ राशी होतील मालामाल

Rashi : बुध पुन्हा एकदा आपली राशी बदलून ९ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. ९ एप्रिल रोजी रात्री ९:२२ वाजता बुध मीन राशीत प्रवेश करेल. या राशीत आधीपासूनच शुक्र आणि राहू उपस्थित आहेत. या तीन ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lakshmi Narayan Yog:

बुध, बुद्धी आणि कीर्ती देणारा ग्रहांचा राजकुमार बुधने मेष राशीत प्रवेश केलाय. मार्च ते एप्रिल या काळात बुध पूर्वगामी तसेच अस्त आणि उदय होईल. इतकेच नाही तर बुध पुन्हा एकदा आपली राशी बदलून ९ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. ९ एप्रिल रोजी रात्री ९:२२ वाजता बुध मीन राशीत प्रवेश करेल. या राशीत आधीपासूनच शुक्र आणि राहू उपस्थित आहेत. या तीन ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. (Latest News)

याशिवाय बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. काही राशीच्या लोकांना या राजयोगामुळे विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसाय आणि नोकरीत तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया मीन राशीत लक्ष्मी नारायण योग बनल्याने कोणत्या राशींना फायदा होईल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मकर राशी

या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. आर्थिक चणचण दूर होण्यासह या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील. यासोबतच करिअरमध्येही बरेच फायदे होतील. ज्या लोकांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ज्यो लोकाचे पैसे इतर लोकांकडे अडकले आहेत. ते पैसे परत मिळू शकतील. अनेकांना धन लाभ होऊ शकतो.

हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. सरकारकडूनही लाभ मिळू शकतो. सरकारी नोकरी किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून काही लोकांना फायदा होऊ शकतो. फिल्म इंडस्ट्री, मॉडेल्स आणि सोशल मीडियाशी संबंधित लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. काही कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.

कर्क राशी

या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग फायदेशीर ठरू शकतो. जे राजकारणात आहेत त्यांना जनतेचा पाठिंबा मिळेल. यासोबतच हा योग आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकतो. अनेकजण त्यांच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतील. बहुतेकांना त्यांच्या कामात पालकांकडून सहकार्य मिळेल. अनेकांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मेष राशी

मेष राशीमध्ये तयार झालेला लक्ष्मी नारायण योग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीतील अनेकजण त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवतील. ज्या लोकांचा पैसा कोणी दत नसेल तर या काळात ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमधून पैसे मिळू शकतात. अनेकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तसेच हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.

देशात व्यवसाय चांगला होणार आहे. नवीन व्यावसायिक व्यवहार होऊ शकते. अनेकांच्या व्यवसायात परदेशातून पैसे मिळतील किंवा घरात मोठी गुंतवणूक होईल. नवीन घर, वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करण्याचा योग या काळात आहे.

डिसक्लेमर : या लेखात दिलेली माहितीतून अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाहीये. ही माहिती ज्योतिषी, पंचांग, ​​श्रद्धा किंवा धार्मिक शास्त्रावर आधारित आहे. साम टीव्ही याला दुजोरा देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण; आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Daily wear Mangalsutra Design: डेली वेअरसाठी 'हे' नाजूक आणि एलिग्नंट मंगळसूत्र डिझाईन, नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील चार नगरपरिषदाच्या दहा जागांसाठी आज मतदान

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे काय? जाणून घ्या याचं मूळ कारण अन् शरीरावर होणारा परिणाम

Weight Loss: दररोज सकाळी 'हे' काम केल्याने वजन होईल लवकर कमी, आठवडाभर करुन पाहा हे उपाय

SCROLL FOR NEXT