Mangal Gochar 
आध्यात्मिक

Mangal Gochar: मंगळ ग्रहाच्या संक्रमणामुळे 'या' तीन राशींवर येणार संकट

Mangal Nakshatra Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली ग्रहांपैकी एक असलेल्या मंगळाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर परिणाम होतो. 8 जुलै रोजी मंगळ कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करत आहे, ज्यामुळे 3 राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Bharat Jadhav

वैदिक ज्योतिषशास्त्रातील एक अतिशय प्रभावशाली ग्रह म्हणजे मंगळ. मंगळचा राशीतील बदलाचाच नव्हे तर नक्षत्र बदलाचाही बारा राशींच्या जीवनावर व्यापक प्रभाव पडत असतो. आज 8 जुलै 2024 रोजी दुपारी 2:11 वाजता ग्रहांचा सेनापती मंगळ सूर्याच्या कृतिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रातील मंगळ संक्रमणाचा प्रभाव बहुतांश राशींवर अनुकूल असण्याची शक्यता असली तरी 3 राशींसाठी प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे.

मिथुन

कृतिका नक्षत्रात मंगळ ग्रहाचं होणारं संक्रमण हे मिथुन राशीच्या जातकांसाठी प्रतिकूल असणार आहे. म्हणजेच काय तर त्यांच्यासाठी हा काळ समस्यांचा असणार आहे. व्यावसायिकांच्या व्यवसायावर सरकारी बंधने येऊ शकतात. कायदेशीर कारवाई होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थी त्यांचे ध्येय साध्य करण्यात अयशस्वी होऊ शकतात. शाळेत वाद होण्याची शक्यता आहे.

किरकोळ व्यापाऱ्यांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. विरोधक आणि शत्रू वरचढ होऊ शकतात. उत्पन्न घटल्याने आर्थिक संकट वाढू शकते. तर कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.

तूळ

कृतिका नक्षत्रात मंगळाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात अशुभ प्रभाव टाकणारे असेल. काही कामात वारंवार अपयश येऊ शकते. पैशाची आवक कमी झाल्यामुळे जीवनातील समस्या वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये संघर्ष वाढू शकतो. परीक्षेत चांगले निकाल मिळण्याची शक्यता कमी आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तो व्यवसाय भागीदारीत असेल तर तुमचे वाद होण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. नोकरदार लोकांच्या खर्चात लक्षणीय वाढ होऊ शकते. कुटुंबात वादाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

कुंभ

कुंभ राशीच्या जातकांसाठीही हे संक्रमण चांगले नाहीये. हाताला काम मिळत नसल्याने युवक नैराश्यात जातील. जे लोक खासगी क्षेत्रात नोकरी करत आहेत, त्यांनी नोकरी बदलण्याचा निर्णय काही काळापुरता थांबावा. ऑफिसमधील काही सहकारी तुमच्या चुका शोधण्यात व्यस्त असतील. तर या राशीतील लोक जे व्यापार किंवा व्यावसाय करत असतील त्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. लगेच कोणावर विश्वास ठेऊ नये. तर वैवाहिक जीवनातही कल निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जोडीदाराशी कोणत्याही कारणावरुन वाद घालू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथ पालिकेत ३७ कामांचे टेंडर बिलो रेटने ओपन!

Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला; दोघांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT