5 zodiac signs Saam Tv
आध्यात्मिक

Zodiac Sign: 'या' ५ राशीतील लोकांचा स्वभाव असतो लाजाळू, पार्ट्यांमध्येही असतात गप्प

5 zodiac signs : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींची माहिती देण्यात आलीय. यात या १२ राशींमधील लोकांचा स्वभाव गुण कसा असतो हे देखील सांगण्यात आले आहे. बारा राशींमधील काही राशींमधील लोकांचा स्वभाव हा लाजाळू असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shy Zodiac Signs:

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कोणत्याही पार्टीत किंवा काही कार्यक्रमात एखाद्या कोपऱ्यात शांत बसून राहिलेला व्यक्ती तुम्ही पाहिला असेलच. ही व्यक्ती सर्व कामांपासून दूर दूर असते. काही लोक त्याला गर्विष्ठ मानतात, परंतु तसे नाही. परिस्थिती त्याच्या उलटी असते. शांत बसून असलेली व्यक्ती नक्कीच लाजाळू निघत असते.(Latest News)

एखादी व्यक्ती आपल्या भावना कोणाकडेही व्यक्त करू शकत नाही. तसेच आपल्या भावनाही व्यक्त करत नाही. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचे वर्णन केले आहे. तसेच या सर्व राशींचे स्वभावदेखील सांगितलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कर्क राशी

वैदिक ज्योतिषशास्त्रात कर्क राशीचे वर्णन केले आहे. कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव भित्रा आणि लाजाळू असतात. हे लोक इतर लोकांची काळजी घेण्यावर विश्वास ठेवतात. हे लोक महान श्रोते आहेत. तसेच कर्क राशीचे लोक विचारशील आणि संवेदनशील असतात. हे लोक शांत राहून कोणत्याही व्यक्तीचे आकलन करू शकतात.

कन्या राशी

कन्या राशीचे लोक स्वभावाने खूप लाजाळू असतात. हे लोक कोणालाही आपले मत मांडण्यापूर्वी खूप विचार करतात. या राशीतील लोकदेखील शांत स्वभावाचे दिसतात. पण हे लोक खूप हुशार असतात. अनेकदा हे लोक योग्य संधीची वाट पाहतात.

वृश्चिक

या राशीचे लोक स्वभावाने खूप गूढ असतात. हे लोक स्वभावाने एकदम शांत असतात. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास असल्याशिवाय ते अज्ञात लोकांसमोर आपले मत व्यक्त करत नाहीत. परिचिती नसलेल्या व्यक्तींसोबत ते ग्पपादेखील करत नाहीत.

मकर

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे लोक स्वभावाने खूप लाजाळू असतात. हे लोक समाजात एकमेकांशी बोलताना खूप लाजत असतात. मकर राशीच्या लोकांमध्ये नेतृत्वगुण असतात पण ते त्यांच्या लाजाळूपणामुळे मागे राहत असतात.

मीन

या राशीचे लोक स्वभावाने अधिक सोपे असतात. हे लोक मजेदार, साहसी आणि विनोदीदेखील असतात. पण जेव्हा ते अनोळखी लोकांच्या गटात जातात तेव्हा ते अत्यंत लाजाळू होत असतात.

टीप : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही याला दुजोरा देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT