सरकारनामा

सावरकरांवरुन सेना -भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची चिन्हं

साम टीव्ही

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केलाय. त्यांच्या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे सेना -भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये पेटलेली ठिणगी इतक्यात विझण्याची शक्यता नाही. शिवसेनेचं हिंदुत्व बेगडी असल्याचं सांगत भाजपने ठाकरेंवर प्रतिहल्ला केलाय. सावरकरांवर काँग्रेसने केलेल्या टिकेचा उल्लेख करत भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
 
महाराष्ट्र काँग्रेसद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या 'शिदोरी' या मासिकात सावरकरांचा 'माफीवीर' असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकावर तातडीने बंदी घालावी आणि काँग्रेसने या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली होती. एवढंच नाही तर या प्रकरणी शिवसेना गप्प का असा सवालही भाजपने केला होता. भाजपच्या या डावावर शिवसेना नेते संजय राऊतांनीही प्रतिडाव टाकलाय.

पाहा संजय राऊत आणि राम कदमांनी सावरकरांवर काय मत व्यक्त केलंय?

महाविकास आघाडीच्या सरकारला शरद पवारांचा टेकू आहे. काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेण्यातही पवारांची भूमिका मोलाची ठरली होती. त्यामुळे पवारांची इच्छा असेपर्यंत हे सरकार टीकणार याची कल्पना भाजपलाही आहे. त्यामुळे सरकार अस्थीर करण्याऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची अधिकाधिक अडचण करण्यालाच भाजपचं प्राधान्य असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambajogai Crime : ४८ लाख रुपयांची घरफोडी आली उघडकीस; तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात

Palghar Politics: पालघरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का; खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करणार

Live Breaking News : पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

Yamini Jadhav Meet Raj Thackeray | महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Rohit Pawar News | बारामतीत पैसे वाटले, आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT