छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील महान योद्धा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांची जयंती म्हणजेच शिवजयंती मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरी केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की शिवजयंती उत्सवाची सुरुवात कोणी केली आणि तो कसा विकसित झाला? चला जाणून घेऊया संपूर्ण इतिहास!
शिवजयंती उत्सवाची सुरुवात समाजसुधारक आणि क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. १८९५ मध्ये प्रथमच सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या माध्यमातून शिवरायांचे कार्य आणि हिंदवी स्वराज्याची महती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पुण्यात अगोदरच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी केली होती.
शिवजयंती श्रद्धेने साजरी केली जातेच. पण याचे आणखी एक कारण म्हणजे जनतेने एकत्र येऊन अशा सार्वजनिक उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावे आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुध्द लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता. सुरुवातीला ही जयंती फक्त महाराष्ट्रामध्ये साजरी होत होती. मग 'सखाराम गणेश देऊस्कर' यांनी बंगालमध्ये शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली.
शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गावोगाव गायक आणि शाहिर गात असत. पेशव्यांच्या काळात देखील काही प्रमाणात शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात असे. मात्र, त्याला सार्वजनिक आणि मोठे स्वरूप लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखालीच मिळाले. ब्रिटिश सरकार शिवाजी महाराजांना फक्त एक स्थानिक राजा मानत असे. टिळकांनी शिवजयंतीद्वारे लोकांमध्ये स्वराज्याची जाणीव निर्माण केली. शिवरायांचे पराक्रम, युद्धकौशल्य आणि राष्ट्रभावना जागवण्यासाठी या उत्सवाचा मोठा उपयोग झाला.
१. तिथीनुसार शिवजयंती (फाल्गुन कृष्ण तृतीया)
ही जयंती हिंदू पंचांगानुसार साजरी केली जाते. पारंपरिक शिवभक्त आणि ऐतिहासिक अभ्यासक या दिवशी शिवजयंती साजरी करतात.
२. १९ फेब्रुवारी - ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार
इतिहास संशोधकांनी शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाल्याचे नोंदवले. महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या १९ फेब्रुवारी ही शिवजयंती म्हणून जाहीर केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.