Shardiya Navratri 2022 Saam Tv
धार्मिक

Shardiya Navratri 2022 : नवदुर्गेच्या आगमना दिवशी बनतोय 'हा' शुभ योग; जाणून घ्या, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

देशभरात १० दिवस नवरात्रौत्सव साजरा केला जातो तसेच दुर्गा पंडाल देखील उभारले जाते. या नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Shardiya Navratri 2022 : हिंदू धर्मात नवरात्रीच्या तिथीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात ४ नवरात्री तिथी असतात, त्यापैकी २ मुख्य असतात तर २ गुप्त असतात. पहिली चैत्र नवरात्र आणि दुसरी अश्विन महिन्याची शारदीय नवरात्र.

यातील शारदीय नवरात्र (Navratra) सर्वात महत्त्वाचे मानली जाते. अनेक ठिकाणी याला दुर्गापूजा असेही म्हणतात. देशभरात १० दिवस नवरात्रौत्सव साजरा (Celebrate) केला जातो तसेच दुर्गा पंडाल देखील उभारले जाते. या नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो.

नवरात्र तिथी ही माँ दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित आहे आणि नऊ दिवस भक्त उपवास करतात आणि श्रद्धेने व भक्तीभावाने तिची पूजा करतात. या वर्षी शारदीय नवरात्री कधी सुरू होत आहे, कलश स्थापित करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया.

यावर्षी शारदीय नवरात्र सोमवार, २६ सप्टेंबरपासून सुरू होत असून बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याला संपेल. यावेळी नवरात्रीमध्ये एक विशेष योग बनत आहे. शारदीय नवरात्रीची सुरुवात शुक्ल आणि ब्रह्म या दोन शुभ योगांनी होत आहे.

नवरात्र शुभ योग

- पहिला योग शुक्ल योग आहे, जो २५ सप्टेंबर रोजी रात्री ०९ वाजून ६ मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, २६ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ०८.०६ पर्यंत चालू राहील.

- दुसरा योग ब्रह्मयोग आहे जो २६ सप्टेंबर, सकाळी ८.०६ वाजता सुरू होईल आणि २७ सप्टेंबर, मंगळवार, सकाळी ०६.४४ वाजता समाप्त होईल.

शारदीय नवरात्री कलश घटस्थापनेचा मुहूर्त (Kalash Sthapna Muhurat)

घट किंवा कलश स्थापनेची वेळ - २६ सप्टेंबर २०२२, सोमवार, सकाळी ०६.२० ते १०.१९ पर्यंत

अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा सुरू होते - २६ सप्टेंबर २०२२, पहाटे ०३.२४ पासून

अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा समाप्ती तारीख - २७ सप्टेंबर २०२२, सकाळी ०३.०८ पर्यंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT