Shardiya Navratri 2022 Saam Tv
धार्मिक

Shardiya Navratri 2022 : हातात सतत पैसा टिकवून ठेवण्यासाठी नवरात्रीत करा 'हे' उपाय, व्हाल मालामाल

या दिवसात देवीची मनोभावे पूजा केल्यास घरात सुख-समृध्दी नांदते.

कोमल दामुद्रे

Shardiya Navratri 2022 : आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्रौत्सव सुरु झाला आहे. या दिवसापासून पुढील नऊ दिवस देवी दुर्गेची मनोभावे पूजा केली जाईल. अधिकतर लोक या दिवसात देवीची मनोभावे अर्चना करुन उपवास करतात. येणाऱ्या संकंटावर मात करण्याची शक्ती मागतात. या दिवसात देवीची मनोभावे पूजा केल्यास घरात सुख-समृध्दी नांदते.

या पवित्र दिवसांमध्ये दुर्गा देवीची अपार कृपा प्राप्त करण्यासाठी, असे काही उपाय देखील केले जाऊ शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि धनलाभाचे योगही मिळू शकतात. या विशेष उपायांनी घरात धनसंपत्ती टिकून राहते आणि सुख-समृद्धी येऊ शकते. या दिवसात काय करायला हवे हे जाणून घेऊया.

१. नवरात्रीच्या काळात तुम्ही कोणत्याही एका दिवशी पाण्यात दही मिसळून अंघोळ करू शकता. जर तुमच्या हातात पैसा जास्त काळ टिकत नसेल तर या उपायाने घरामध्ये समृद्धी येईल आणि संपत्ती वाढेल.

२. नवरात्रीच्या काळात आपल्याला दुर्गेची ९ रूपे आठवतात. असे मानले जाते की, तिच्या नऊ रुपांचे सतत स्मरण केल्यास धन टिकून राहाते. नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी पाण्यात हिरवी वेलची टाकून अंघोळ केल्यास अपार संपत्ती मिळेल.

३. नवरात्रीच्या काळात धनलाभासाठी माता लक्ष्मीची विशेष पूजा करावी. या दिवशी तुम्ही श्री सूक्ताचे पठण केल्यास, त्याचा तुम्हाला फायदा होईल.

४. अष्टमीच्या दिवशी नियमितपणे दुर्गा देवीची पूजा करा. असे केल्याने तुमच्यासाठी धनाचा योग निर्माण होईल आणि पती-पत्नीचे नातेही घट्ट होईल.

५. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढरी गाय, कमळ गट्टे, अख्खी सुपारी, हिरवी वेलची, मखना या सर्व वस्तू घेऊन त्यात मूठभर हवन साहित्य मिसळून जपमाळ १०८ वेळा जपून हवन करावे.

६. नवरात्रीच्या (Navratra) पूजेदरम्यान हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना पान अर्पण करावे. या उपायाने तुमच्यासाठी संपत्तीचे मार्ग खुले होतील.

७. नोकरी (Job)-व्यवसायात प्रगती करायची असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसात सुपारीचा वापर करा. या दिवसात एक सुपारी घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्या ठेवाव्यात आणि देवी दुर्गाला अर्पण कराव्यात. या उपायाने तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील.

८. नवरात्रीमध्ये घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावा, हे देखील सुख-समृद्धीचे कारक आहे. हळद किंवा कुंकू लावून स्वस्तिक बनवल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

९. नवरात्रीत कलश किंवा घटाच्या पूजेलाही विशेष मान्यता आहे. या काळात घरामध्ये कोणत्याही कारणाने घट बसवता येत नसेल तर मंदिरात जाऊन घटाची पूजा करावी.

१०. नियमितपणे दुर्गा सप्तशती अर्गल स्तोत्राचा जप करा आणि दुर्गा चालिसाचा पाठ करा. या उपायाने घरात धनाचा वर्षाव होईल. नवरात्रीत दुर्गा मंत्राचा जपही विशेष आहे. या दिवसात या मंत्राचा जप केल्यास फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: लक्ष्मीच्या कृपेमुळे पैशाची चणचण दूर होणार, दिवाळीत या राशींच्या व्यक्तींचे नशीब उजळणार

Monday Horoscope : दिवाळी चांगली जाईल, मनातील इच्छा पूर्ण होणार; 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

Viral Video of Namaz at Shaniwarwada: 'ते' एक ट्विट आणि शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; ऐन दिवाळीत पुण्यातील वातावरण का तापले?

Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT