sant tukaram beej sohala at versova 7 bungalows hanuman mandir  saam tv
धार्मिक

Sant Tukaram Beej 2024 : वर्सोव्यातील चौपाटीवर उभारली आयोध्या मंदिराची लक्षवेधी प्रतिकृती, हरिनाम सप्ताहात भक्त तल्लीन

या साेहळा कालावधीत महेश महाराज माकणीकर, राम महाराज कदम, तुकाराम महाराज रसाळ,हरिदास महाराज पालवे, किसन महाराज धंदरे, नितीन महाराज काकडे यांचे कीर्तन सेवा पार पडणार आहे.

Siddharth Latkar

- संजय गडदे

Mumbai :

मुंबई येथील अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथे 3 एप्रिलपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण सोहळ्याचे (sant tukaram beej sohala at versova 7 bungalows hanuman mandir) आयोजन करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्ताने (Sant Tukaram Beej 2024) वर्सोवा सात बंगला येथील गणेश हनुमान मंदिरात 3 एप्रिलपर्यंत हा सप्ताह असणार आहे. या साेहळ्याची समाजसेवक सचिन शिवेकर यांच्या हस्ते वीणा पूजनाने झाली. या कालावधीत कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता राजाराम महाराज जगताप यांच्या कीर्तनाने होणार आहे.

समाजसेवक सचिन शिवेकर यांच्या संकल्पनेतून वर्सोवा चौपाटीवर अयोध्या श्रीराम मंदिराचा देखावा देखील उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतातील पहिल्या प्रसिद्ध महिला वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी या ठिकाणी समुद्राच्या वाळू पासून विठ्ठल पांडुरंगाचे वाळू शिल्प देखील उभारले आहे. अयोध्या मंदिर आणि विठ्ठल पांडुरंगाचे शिल्प पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांची गर्दी देखील होत आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT