Do this remedy on saturday ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय शनिवारी करा

शनिची उपासना केल्यावर त्याचा फायदा कसा होतो हे जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची चंद्ररास शनि असेल किंवा तिच्या आधीच्या किंवा पुढच्या राशीत शनी असतो. तेव्हा त्या व्यक्तीला साडेसाती आहे असे समजले जाते.

हे देखील पहा-

शनिदेवाची उपासना करण्यासाठी आपण शनिवारी त्याची उपासना करतो. ज्या व्यक्तीवर शनीची दृष्टी असते त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, शनिदेव ज्या व्यक्तीवर प्रसन्न होतात त्या व्यक्तीला तर रंकातून राजा देखील बनवू शकतात. शनिचे चांगले व वाईट असे दोन्ही स्वरुपाची फले मिळतात. शनि हा ग्रह त्याच्या कर्मानुसार फले देतो. माणसाचे कर्म चांगले असेल तर त्याचे चांगले फळ नक्कीच मिळते. तर ज्याचे कृत्य वाईट असेल तर शनिदेव त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देतात.

शनिवारी या गोष्टी केल्याने शनि देवाची कृपा आपल्यावर होईल-

१. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि सातव्या किंवा अकराव्या स्थानात असेल किंवा मकर, कुंभ किंवा तूळ राशीत आहे त्यांना शनि ग्रहाचा त्रास फार होत नाही. परंतु, याशिवाय शनि इतर कोणत्याही घरात असल्यास शनिवारी उपवास करणे शुभ मानले जाते. दर शनिवारी नियमितपणे उपवास केल्यास शनि दुर्बल होऊन आपले कष्ट कमी होतात.

२. जर आपल्याला शनीची महादशा किंवा साडेसाती सुरु असेल तर आपल्याला त्याचे तीन टप्प्यात फले मिळतात. कधी चांगले (Good), कधी वाईट व कधी चांगले- वाईट असे तिन्ही स्वरुपाचे फले मिळतात. यासाठी साडेसाती असणाऱ्या व्यक्तींनी दान करावे.

३. शनिला गुरुची साथ मिळण्यासाठी आपण विभूती, लाल चंदन किंवा भस्म लावावा. शनिला गुरूची साथ मिळाल्यास शनीची चांगली फळे मिळू लागतात. तसेच, आपल्या कोणत्याही कामात कोणताहे अडथळे येत नाही. सर्व काम सहजतेने यशस्वी होतात.

४. जर आपल्यापैकी कुणाच्या कुंडलीत पितृ दोषाचा प्रभाव असेल तर त्या व्यक्तीने हनुमान चालिसाचे पठण करावे. याशिवाय दर शनिवारी उपवास (Fast) करताना सुंदरकांड किंवा बजरंग बाणाचा पाठ अवश्य करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT