यवतमाळ - जैव विविधता Biodiversity आणि अन्नसाखळीमध्ये Food chain प्रत्येक सजीवांचे आपापले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि महत्व आहे. हे आपण जाणून घेतले पाहिजे. त्या जीवाचा कळत नकळत फायदा होत असतो. तो आपल्याला जाणवत नाही .The Snake-friends gave life to the Python
म्हणून प्रत्येक सजीवांचे रक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माणिकवाडा इथे नारायण पारधी यांच्या शेतात गुरांचा चारा म्हणून असलेल्या मका पिकामध्ये अजगर दडून बसला होता. पारडी यांनी तात्काळ सर्पमित्राना पाचारण केले. त्याला सर्पमित्रांनी या अजगराला जेरबंद केले.
हे देखील पहा -
माणिकवाडा येथील शेतकरी नारायण पारधी यांच्या शेतात मक्याच्या पिकात हा अजगर दडून बसला होता. 7 फूट लांबीचा हा अजगर शेतमालक नारायण स्पिंकलर पाईप उचलल्या करिता गेले होते. तेव्हा त्यांना अजगर दिसून आला.
भक्ष्याच्या शोधात हा अजगर आल्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांनी त्वरित सर्पमित्र नरेंद्र गुरनुले यांना बोलावून घेतले. हा साप नरेंद्र गुरनुले यांनी मोठ्या शिताफीने पकडून पिशवीत भरला. लवकरच त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
Edited By - Puja Bonkile
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.