बातमी मागची बातमी

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातंच बोगस खतांची विक्री, शेतकऱ्याच्या समयसूचकतेनं धक्कादायक प्रकार उघड

साम टीव्ही

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातचं बोगस खतांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका तरुण शेतकऱ्याच्या समयसूचकतेमुळे चांदवडमध्ये बोगस खतांची विक्री होत असल्याचं समोर आलंय.

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट राज्यातला शेतकरी पुरता नाडला गेलाय. हे कमी होतं म्हणून की काय आता शेतकऱ्यांच्या माथी बोगस खतं मारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातचं बोगस खतांची सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कोरोनामुळे आधीच सगळं विस्कटल्ंय त्याात आता यामुळे मोठा अनैतिक प्रकार आढळल्यानं त्याला वाचा फुटलीय.
त्याचं झालं असं चांदवडच्या भरत कोतवाल या शेतकऱ्यानं चांदवड-मनमाड रस्त्यावरील इंदुमती बहुउद्देशिय संस्थेच्या दुकानातून इफको कंपनीची एनपीके ११-३२-१६ ही खताची गोणी 1 हजार 180 रुपयांना खरेदी केली होती. शेतात ही गोणी फोडताचं दाणेदार खतांऐवजी दगड, कोंबडीचे पीस, रबर, पिशव्या असा अतिरिक्त कचरा त्यात आढळून आला. याबाबत त्यांनी तात्काळ संबंधित विक्रेत्याशी फोनवरून संपर्क साधला असता उडवा-उडवीची उत्तरं मिळाली. कोतवाल यांनी लगेच काही शेतकऱ्यांसह दुकान गाठत विक्रेत्याच्या हा प्रकार लक्षात आणून दिल. मात्र त्यानंतरही विक्रेत्याची अरेरावी सुरू होती. अखेर या तरूणानं थेट कृषी अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. 

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषीविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन दुकानात विक्रीसाठी आणलेल्या चार गोण्या फोडुन पाहणी केली असता, त्यात दाणेदार खतांऐवजी दगड, प्लॅस्टिक, कोंबडीचे पीस आणि कचरा आढळून आला. शिवाय चारही खतांच्या रंगात देखील फरक आढळून आल्यानं कृषीविभागाकडून याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. 

दरम्यान कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातचं बोगस खत विक्री होत असल्याचा प्रकार समोर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : शेतकरी, गाव समृद्ध व्हायचं असले तर आणि पाण्याची सोय झाली पाहिजे; नितीन गडकरी

Amrita Pandey च्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

SCROLL FOR NEXT