Supreme Court Job Saam Tv
naukri-job-news

Supreme Court Job: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी; १०वी पास तरुणांनो आजच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

Supreme Court Recruitment 2024: सर्वोच्च न्यायलयात नोकरी करण्याची चांगली संधी आहे. सर्वोच्च न्यायालयात १० वी पास उमेदवारांसाठी ज्युनिअर कोर्ट अटेंडेंट पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.सुप्रीम कोर्टात भरती सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२४ म्हणजे आज आहे.

ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला स्वयंपाकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत एक वर्षाचा कुकिंग डिप्लोमा केलेला असावा.

ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज फी ४०० रुपये आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २०० रुपये अर्ज फी भरायची आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २१,७०० ते ४६,२१० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ऑइल इंडिया लिमिटेडमध्येही नोकरीची सुवर्णसंधी आहे. ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये सिव्हिल इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठीही अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT