SBI Recruitment Google
naukri-job-news

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १५० रिक्त जागांसाठी भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

State Bank Of India Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरु आहे. बँकेत १५० रिक्त जागांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२४ आहे.

Siddhi Hande

सरकारी बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही बँकेत काम करायचे असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरु आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेत रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ७ जून २०२४ पासून सुरु झाली आहे. २८ जून २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या पदासाठी ही भरती आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. www.onlinesbi.sbi या वेबसाइटवर जाऊन तुम्ही फ़र्म भरु शकतात.

ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या एकूण १५० रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्याकडे आयआयबीएफ फॉरोक्स कोर्स सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे ट्रेड फायनान्ससंबंधित कोर्सचे सर्टिफिकेट असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती पाहू शकतात.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान २३ ते ३२ असणे गरजेचे आहे. ३१ डिसेंबर २०२३ च्या आधारावर वयोमर्यादा निश्चित केली जाईल. ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या जागेवर उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे घेतली जाईल. मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

SCROLL FOR NEXT