SSC Recruitment Saam Tv
naukri-job-news

SSC Recruitment: १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; कर्मचारी निवड आयोगाद्वारे 'या' पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

SSC Stenographer Recruitment: कर्मचारी निवड आयोगाने स्टेनोग्राफर पदासाठी भरती जाहीर केली आहे. २००६ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोगाद्वारे ग्रेड C आणि ग्रेड B पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जवळपास २००६ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करावेत.

१२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. भारत सरकारद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची जाहीर कर्मचारी निवड आयोगाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी पास असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १८ ते ३० वर्षातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

१७ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे.यासाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतरच तुमची निवड करण्यात येईल.

जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर नॅशनल बँकेत सध्या भरती सुरु आहे. लिपिक पदे ते ऑफिसर अशा अनेक पोस्टसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT