RRB NTPC Recruitment  Saam Tv
naukri-job-news

RRB NTPC Recruitment : तरुणांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वेत तब्बल ११५८८ पदांसाठी सर्वात मोठी नोकरभरती; वयाची अट अन् पात्रता काय? जाणून घ्या...

Railway RRB NTPC Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आरआरबी एनपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची असेल तर आरआरबी एनटीपीसीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. RRB NTPC मध्ये नोकरीसाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

RRB NTPC भरतीमध्ये ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात. ग्रॅज्युएटसाठी ८११३ पदे भरती करण्यात येणार आहे. तसेच अंडरग्रॅज्युएटसाठी ३४४५ पदे भरती केली जाणार आहे. रेल्वे एनटीपीसीमध्ये एकूण ११५८८ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या दोन्ही पदांसाठी रजिस्ट्रेशनची तारीख वेगवेगळी आहे.

आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट पदांसाठी अर्जप्रक्रिया १४ सप्टेंबर २०२४ रोजी सुरु होणार आहे. १३ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर अंडरग्रॅज्युएट पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी पास असणे गरजेचे आहेत. पदवीधर पदांसाठी १८ ते ३६ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तर अंडरग्रॅज्युएच पदासाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्ज कसा करायचा?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आरआरबीच्या प्रादेशिक वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला अर्ज करायला लागेल. यासाठी तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागणार आहे.

सिलेक्शन कसं होईल?

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट १ आणि सीबीटी स्टेज २ ची परीक्षा होईल. तसेच तुमची टायपिंग स्किल आणि कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टीट्युड टेस्ट द्यावी लागणार आहे. यानंतर कागदपत्रे पडताळणीनंतर वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

या नोकरीसाठी मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे. ट्रेन क्लर्क पदासाठी १९,९०० रुपये वेतन देण्यात येणार आहे तर कमर्शियल कम तिकट क्लर्क साठी २१,७०० रुपये वेतन देण्यात येणार आहे. स्टेशन मास्टर पदासाठी ३५,४०० रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Insulin resistance: सतत भूक लागतेय, थकवा येतोय? डायबेटीजचं सुरुवातीची लक्षणं असू शकतं, शरीरातील ५ बदलांकडे दुर्लक्ष करू नका!

Matar Recipe : वाटीभर मटारचा १० मिनिटांत बनवा हेल्दी नाश्ता, मुलं आवडीने फस्त करतील टिफिन

US–Iran Conflict : मोठी बातमी! सर्व मोठे नेते मारले, इराण उद्ध्वस्त; डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्ध जिंकल्याचा दावा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! ६० लाख महिलांचे ₹१५०० कायमचे बंद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT