RBI Google
naukri-job-news

RBI Recruitment 2024: RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; Grade B पदांसाठी 'या' दिवशी सुरु होणार अर्ज प्रक्रिया

RBI Grade B Recruitment 2024 Application Date: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. RBI Grade B पदासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. आरबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेत नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. याच तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. RBI Grade B अंतर्गत लवकरच पदभरती केली जाणार आहेत. याबाबत अधिसूचना १८ जुलै २०२४ रोजी प्रकाशित करण्यात येईल.

आरबीआय ग्रेड बी २०२४ भरती लवकरच सुरु होणार आहे. याबाबत माहिती आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात येईल. या नोकरीसाठी दोन परीक्षा घेण्यात येतील. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. या तीन फेऱ्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. या नोकरीसाठी टप्पा १ परीक्षा (Phase 1 Exam) ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल.

RBI Grade B नोकरीसाठी प्रिलियम, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यानंतर १५ दिवसांची ट्रेनिंग दिली जाईल. त्यानंतर २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी असेल. ही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करायचे आहे त्यांनी या परीक्षेचा चांगला अभ्यास करावा.

याचसोबत आरबीआयने Grade B (Gneral/DEPR/DSIM)-PY 2024 साठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २५ जून २०२४ पासून सुरु झाली आहे. त्यामुळे तुम्ही या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापुरात आमदार किसन कथोरेंच्या घराबाहेरील रस्त्यावर गोळीबार

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

SCROLL FOR NEXT