District Court Recruitment Saam Tv
naukri-job-news

District Court Recruitment: जिल्हा न्यायालयात 'या' पदासाठी सुरु आहे भरती;मिळणार १ लाख ९४ हजार रुपये पगार; अर्ज कसा करायचा?जाणून घ्या

District Court Recruitment 2024: जिल्हा न्यायलयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. न्यायाधीश पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तब्बल १ लाख ९४ हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

Siddhi Hande

ज्या विद्यार्थ्यांचे एल.एल.बीचे शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर लगेचच अर्ज दाखल करावा.

राजस्थान उच्च न्यायालयाने ९ जुलै रोजी याबाबत अधिसूचना जाहिर केली होती. या रिक्त पदांसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला राजस्थान उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

या भरतीसाठी एकूण ९५ पदे भरण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०२४ आहे. तर अर्जाचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला hcraj.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागेल. याबाबत अधिक माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीची निवड लेखी परिक्षेद्वारे होणार आहे. ही लेखी परीक्षा कधी घेण्यात येणार आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.ही परीक्षा जोधपूर आणि जयपूरमध्ये घेतली जाईल.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय उमेदवाराकडे ७ वर्ष कामाचा अनुभव असावा. या पदासाठी ३५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जाची फी भरावी लागेल. या पदासाठी निवड झाल्यास दर महिना १४४८४० ते १९४६६० रुपये पगार दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही https://hcraj.nic.in/hcraj/hcraj_admin/uploadfile/recruitment/Binder1172050260026.pdf या लिंकवर क्लिक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्...

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT