Railway Recruitment Canva
naukri-job-news

Railway Bharti 2024: दहावी,बारावी पास उमेदवारांसाठी मध्य रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज भरण्याची शोवटची तारीख..

Railway Recruitment 2024 Application Last Date: मध्य रेल्वेमध्ये तरुणांना नोकराची सुवर्ण संधी चालून आली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी रेल्वे रिक्रूटमेंट सेलकडून १६ जुलै रोजी भरती जाहीर करण्यात आलीय. या नोकरीमध्ये पात्रतेनुसार तुम्हाला पगार मिळेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल नोकरी मिळणं खूप कठीण झालंय. उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही नोकरी मिळवणं एक आव्हान झाले आहे. याचदरम्यान मध्यरेल्वेने एक आनंदाची बातमी दिलीय. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मध्य रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल यांच्याकडून मध्य रेल्वेमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती करण्यात येणार आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने १६ जुलै रोजी त्याच्या अधिकृत वेबसाईटवर पदांची घोषणा केलीय.

रेल्वे रिक्रूटमेंट सेलकडून मध्य रेल्वेमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी नोकरीची घोषणा करण्यात आलीय. मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी एकूण २, ४२४ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरपदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीय.

मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट संध्याकळी ५ वाजेपर्यंतची आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड त्यांच्या गुणांच्या आधारे होणार आहे. या पदासाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाहीये. नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी आवश्यक पात्रता काय?

मध्य रेल्वेमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष असणे आवश्यक आहे. त्यासोबतच दहावीमध्ये ५०% पेक्षा जास्त टक्के असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे नॅशनल ट्रेड प्रमाणपत्र आणि नॅशनल कौन्सिल व्होकेशनल ट्रेनिंग प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. SC आणि ST च्या उमेदवारांसाठी ५ वर्षाची तर OBC असलेल्या उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

Edited by : Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT