Railway Recruitment Saam tv
naukri-job-news

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ११५४ जागांसाठी भरती; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ईस्ट सेंट्रल रेल्वेत ११५४ अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईस्ट सेंट्रल रेल्वेत ११५४ अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही rrcecr.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२५ होती. (Railway Recruitment)

या नोकरीसाठी विविध डिविजनमध्ये भरती होणार आहे.विविध विभागात ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांने १०वी पास उत्तीर्ण केलेले असावे. या नोकरीसाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयमध्ये प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. (Railway Job)

रेल्वेतील अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. उमेदवाराने १०वी आणि आयटीआयमध्ये चांगले गुण मिळवलेले असावे.या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

रेल्वेतील या भरती मोहिमेत अर्ज करताना १०० रुपये शुल्क भरायचे आहे.राखीव प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. पूर्व मध्य रेल्वेच्या rrcecr.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT