Railway Job Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; ३२४३८ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या ३२४३८ रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी १०वी पास तरुण अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या ३२४३८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ जानेवारी २०२५ पासून सुरु होणार आहे.

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. रेल्वेतील या भरतीमधील लेवल १ पदांसाठीच्या शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आले आहेत. या लेवल १ पदांसाठी १० वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकणार आहे.

रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.आरआरबीच्या अधिसूचनेनुसार ग्रुप डी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. लेवल १ पदांसाठी याआधी आयटीआय डिप्लोमा असणे अनिवार्य होते. मात्र, आता ही अट रद्द करण्यात आली आहे.

रेल्वेतील ही भरती ३२४३८ पदांसाठी करण्यात येणार आहे. यात पॉइंट्समॅन बी पदासाठी ५०५८ जागा रिक्त आहेत. असिस्टंट पदासाठी ७९९ पदे रिक्त आहे. असिस्टंट पदासाठी ३०१ जागा रिक्त आहे. ट्र्रॅक मॅनेजर पदासाठी १३१८७ जागा रिक्त आहेत. असिस्टंट पदासाठी २५७ जागा रिक्त आहेत. असिस्टंट पदासाठी २०१२ जागा रिक्त आहे. असिस्टंट लोको शेड पदासाठी ४२० जागा रिक्त आहेत. असिस्टंट लोको शेड पदासाठी ९२० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रेल्वेतील ही भरती कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होणार आहे. यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची नोकरीसाठी मेरिट लिस्टद्वारे निवड केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

SCROLL FOR NEXT