Railway Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ग्रुप बी आणि सी पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Railway Recruitment 2024: रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेत ग्रुप बी आणि सी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

Indian Railways Recruitment: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेत सध्या भरती सुरु केली आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेत ४६ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी रेल्वे भरती बोर्डाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वेत ग्रुप बी आणि ग्रुप सी (स्पोर्ट्स कोटा) मध्ये भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२४ आहे. (Railway Recruitment)

रेल्वेमधील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित खेळात प्रमाणपत्र मिळवलेले असावे. म्हणजेच अर्ज करणारा उमेदवार बास्केटबॉल, क्रिकेट, अॅथेलटिक्स खेळत असेल तर त्या खेळातील प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

रेल्वेतील या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सहाय्यक कार्मिक अधिकारी/मुख्यालय, दक्षिण पश्चिम रेल्वे- मुख्यालय कार्यालय, कार्मिक विभाग, रेल सौधा, गदग रोड, हुबळी येथे पाठवायचा आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर अनेक भत्ते मिळणार आहे. (Railway Job News)

यूनियन बँकेत भरती (Union Bank Bharti)

सरकारी नोकरीच्य शोधात असणाऱ्या तरुणांना यूनियन बँकेतदेखील अर्ज करण्याची संधी आहे. यूनियन बँकेत लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे.१५०० रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ८०,००० रुपये पगार मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मिरारोड मध्ये पोलिस ठाण्यात हाणामारी

Maharashtra Election : महिला नेत्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली तर कठोर कारवाई; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

IND vs SA 1st T20I: केव्हा, कुठे रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना? इथे पाहा फुकटात

CM Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंची यांची मशाल घराघरांत आग लावणारी; एकनाथ शिंदे यांचा धाराशिवातून घणाघात

Amit Shah : राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?

SCROLL FOR NEXT