RITES Recruitment  Saam Tv
naukri-job-news

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

RITES Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल इंडिया टेक्निक अँड इकोनॉमिक लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. RITES म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक लिमिटेडमध्ये तब्बल ६० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. राइट्समध्ये असिस्टंट हायवे इंजिनियर, असिस्टंट ब्रीज/स्ट्रक्चरल इंजिनियर आणि क्वालिटी कंट्रोल इंजिनियर या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. (Government Job)

रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

असिस्टंट हायवे इंजिनियर पदासाठी ३४ जागा रिक्त जागा आहेत. असिस्टंट ब्रीज/स्ट्रक्चरलर इंजिनियर पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. क्वालिटी कंट्रोल इंजिनियर पदासाठी २० जागा रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (RITES Recruitment)

राइट्समधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०२४ असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी.

RITES च्या या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू २ डिसेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत होऊ शकतो.

या नोकरीसाठी उमेदवारांना पगार त्यांच्या पात्रतेनुसार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २५,५०४ ते ४६,४१७ रुपये पगार मिळणार आहे.(RITES Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT