Railway Jobs Saam Tv
naukri-job-news

Railway Jobs: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु, पात्रता आणि अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या

South Western Railway Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेत सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ११ रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

दक्षिण- पश्चिम रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

दक्षिण-पश्चिम रेल्वेत स्काउट्स आणि गाइड कोटाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी,१२वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित ट्रेडमधून आयटीआय पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. पात्र उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.

साउथ वेस्टर्न रेल्वेतील या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला तुमचा अर्ज सहाय्यक कार्मिक अधिकारी, मुख्यालय, दक्षिण पश्चिम रेल्वे- मुख्य कार्यालय, रेल सौधा, गदग रोड, हुबळी-५८००२० येथे पाठवायचा आहे. १८ ते २५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०२४ आहे.

भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये भरती

सध्या सरकारी कंपनी भारत डायनामिक्स लिमिटेडमध्येही भरती सुरु आहे. १५० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी करिअरची सुरुवात करण्याची ही चांगली संधी आहे. अप्रेंटिस ट्रेनिग प्रोग्रामअंतर्गत ही भरती केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT