Bank Job Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs : या बँकेत २०० हून अधिक स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती; अर्ज कसा कराल?

Punjab And Sind Bank Recruitment: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. पंजाब अँड सिंध बँकेत २०० हून अधिक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे.

पंजाब अँड सिंध बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ आहे. या भरती प्रक्रियेत २०३ पदे भरण्यात येणार आहे. ही नोकरी अधिकारी पदासाठी आहे. या भरती मोहिमेत JMGS-I,MMGS-II,MMGS-III, SMGS-IV ग्रेड्स पदे भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार punjabsindbank.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना ८५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदावारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेच्या आधारे केली जाणार आहे.त्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम punjabsindbank.co.in या वेबसाइटवर जा.

  • त्यानंतर होमपेजवर Recruitment वर क्लिक करा.

  • यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करु शकतात.

  • यानंतर तुम्ही आवश्यक माहिती भरुन कागदपत्रे अपलोड करा. यानंतर अर्ज शुल्क भरावे.

  • या फॉर्मची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीनं जिंकली नाणेफेक, गुजरातला दिलं फलंदाजीचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीतून अभिमन्यू खोतकर यांची माघार

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा १५०० रुपये मिळणार? सुप्रिया सुळेंची फडणवीस सराकारकडे मोठी मागणी

Monday Horoscope: कामाच्या ठिकाणी कौतुक होणार, ५ राशींचे बढतीचे योग आहेत; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Fort In Nashik : आकाशाला भिडणाऱ्या पायऱ्यांचा थरार, नाशिकमधील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून हृदयाचा ठोका चुकेल

SCROLL FOR NEXT