PMC Bharti Saam Tv
naukri-job-news

PMC Bharti: पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Pune Mahanagarpalika Recruitment: पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. पुणे महानगरपालिकेत १० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेत (Pune Mahanagarpalika Bharti) राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत भरती करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत. याबाबत सविस्तर माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेत (PMC Recruitment)पीपीएम कोऑर्डिनेटर, वरिष्ठ वैद्यकीय सुपरवायजर, टीबी हेल्थ विजिटर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण १० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://www.pmc.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

पीपीएम कोऑर्डिनेर पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावेत. याचसोबत हेल्थ प्रोजेक्टसवर १ वर्ष काम करण्याचा अनुभव असावा. सिनियर ट्रिटमेंट सुपरवायजर दासाठी बॅचरल डिग्र प्राप्त केलेी असावी किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असावा. टीबी हेल्थ विजिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा विज्ञान शाखेतून पदवीधर असवेत. याचसोबत कामाचा अनुभ असावा.

जिल्हा पीपीएम कोऑर्डिनेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला २०,००० रुपये पगार मिळणार आहे. सिनियर ट्रिटमेंट सुपरवायजर पदासाठीही २०,००० रुपये पगार मिळणार आहे. टीबी हेल्थ विजिटर पदासाठी १५५०० रुपये पगार मिळणार आहे.

पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. जर तुमच्याकडे १-२ वर्षांचा अनुभव असेल तर काम करण्याची उत्तम संधी आहे. हा अनुभव भविष्यात खूप कामाला येईल. पुणे महानगरपालिकेसारख्या चांगल्या विभागात काम करण्याची ही संधी गमवू नका. इच्छुकांनी आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

SCROLL FOR NEXT