Zilla Parishad Job Saam Tv
naukri-job-news

Zilla Parishad Job : जिल्हा परिषदेत शिक्षक पदासाठी सर्वात मोठी भरती; तब्बल १८९१ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, असा करा अर्ज

Zilla Parishad Job: जिल्हा परिषदेत शिक्षक पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल १८९१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि इतर प्रवर्गातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

राज्य सरकारअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. १८९१ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार असणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शिक्षक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. १२वी उत्तीर्ण,D.Ed./D.EI. T.ED/TCH,TET/CTET पेर १ उत्ती्ण, पदवीधर/D.EI/B.Sc, सीटीईटी पेपर २ उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.पालघर जिल्हा परिषद शाळेत नोकरी करता येणार आहे.

या नोकरीबाबत सर्व माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. याच वेबसाइटवर अर्जाचा नमुना दिला आहे. हा अर्ज भरुन तुम्ही तो जिल्हा परिषदेच्या कार्यलयात पाठवू शकतात.२३ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. हा अर्ज इच्छक उमेदवारांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत,दालन क्रमांक-१७, कोळगाव, पालघर-बोईसर रोड येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT