ONGC Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

ONGC Job: ONGC मध्ये नोकरी अन् ६६००० रुपये पगार; या पदांसाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

ONGC Recruitment 2024: ओएनजीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

Siddhi Hande

ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. ओएनजीसीमध्ये ज्युनिअर कन्सल्टंट आणि असोसिएट कन्सल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ओएनजीसीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. यामध्ये ४ पदे भरती केली जाणार आहे. (ONGC Recruitment)

ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइटनर या नोकरीबाबत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत वर्कओवर, ड्रिलिंग ऑपरेशन्सच्या मेटेंनेंस विभागात कामाचा १० वर्षांचा अनुभव असावा. (ONGC Recruitment 2024)

ओएनजीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ६३ वर्षे असावी.ज्युनिअर कंसल्टंट पदासठी तुम्हाला ४०,००० रुपये पगार मिळणार आहे. तर असोसिएट पदासाठी ६६००० रुपये पगार मिळमार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंगच्या आधारे केली जाणार आहे. त्यानंतर मुलाखतीद्वारे तुमची निवड केली जाणार आहे. याबाबत तुम्हाला मेलद्वारे माहिती दिली जाईल.याबाबत तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन पाहा आणि त्यात दिलेल्या ई-मेलवर जाऊन अर्ज करावेत.

टाटा टेक्नोलॉजीमध्ये भरती (Tata Technologies Recruitment)

सध्या टाटा टेक्नोलॉजीमध्येही भरती सुरु आहे. टाटा टेक्नोलॉजीमध्ये क्लाउज इंजिनियर, इंजिनियर पदांसाठी भरती सुरु आहे. १०० पेक्षा अधिक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT