Railway Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी;तब्बल ४०९६ अप्रेटिंस पदासाठी सुरु आहे भरती;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Northen Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. उत्तर रेल्वेत तब्बल ४०९६ अप्रेटिंस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करावी अशी अनेकांची इच्छा असते. जर तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. उत्तर रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवांरानी लवकरात लवकर अर्ज करावेत.

उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी तब्बल ४०९६ पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर असणार आहे. या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

रेल्वेमध्ये तब्बल ४०९६ शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिसमध्ये फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक डिझेल, मॅकेनिक मोटर व्हेईकल अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून १०वी पास असणे गरजेचे आहे त्याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

रेल्वेसोबत अनेक ठिकाणी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेत अनेक पदांसाठी रिक्त जागा आहेत. ऑफिसर ते वॉचमन या सर्व पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठीदेखील अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT