Metro Job Saam Tv
naukri-job-news

Metro Job: मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी, पगार १,२०,००० रुपये, पात्रता काय? जाणून घ्या

Noida Metro Job: नोएडा मेट्रो कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. जनरल मॅनेजर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रोमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. एनएमआरसीने जनरल मॅनेजर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.(Noida Metro Job)

नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स) पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. त्याचसोबत कामाचा अनुभवदेखील असावा. या नोकरीबाबत सविस्तर माहिती नोएडा मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Noida Metro Recruitment 2024)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्ष असावी. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,२०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.

जनरल मॅनेजर पद डेप्युटेशनद्वारे भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जनरल मॅनेजर प्रोजेक्ट, फायनान्स अँड एचआर, नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ब्लॉक ३, तिसरा मजला, गंगा शॉपिंग कॉम्प्लेक्स, सेक्टर २९ नोएडा येथे कागदपत्रे पाठवायची आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT