NMDC Recruitment Saam Tv
naukri-job-news

NMDC Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NMDC मध्ये भरती सुरु; अर्ज कसा अन् कुठे करावा?

NMDC Recruitment 2025: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. एनएमडीसीमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करायची इच्छा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच NMDC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

या पदांसाठी भरती

NMDC मध्ये फिल्ड अटेंडेंट आणि मेटेंनंस असिस्ंटट या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ९९५ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचावी. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२५ आहे.

एनएमडीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आयटीआय, तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा डिग्री प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता बदलणार आहे. (NMDC Recruitment 2025)

या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना अर्ज करताना १५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सिलेक्शन प्रोसेस

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ओएमआर बेस्ड टेस्ट, फिजिकल टेस्ट आणि ट्रेड टेस्टद्वारे होणार आहे. या सर्व राउंडमध्ये जो उमेदवार पास होईल, त्याचीच निवड केली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

या नोकरीसाठी अर्ज करताना पासपोर्ट साइज फोटो, १०वीचे मार्कशीट, जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र आणि स्कॅन केलेली सही लागणार आहे. त्यामुळे अर्ज करताना हे सर्व कागदपत्र तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Officers Promotion: राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

SCROLL FOR NEXT