NMDC Recruitment Saam Tv
naukri-job-news

NMDC Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; १९७ पदांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

NMDC Recruitment 2025: सरकारी कंपनीत नोकरीची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. एनएमडीसीमध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

भारत सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) मध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. कंपनीत अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे. एनएमडीसीमध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची उत्तम संधी आहे.

एनएमडीसीमध्ये ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या कंपनीत काम करुन तुम्हाला अनुभव मिळणार आहे.यामुळे तु्म्हाला इतर ठिकाणीदेखील नोकरीची संधी मिळेल. जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर ही संधी सोडू नका. या नोकरीमध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यावर तुम्हाला सर्टिफिकेटदेखील मिळणार आहे.

एनएमडीसीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. १९७ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १६ पेक्षा जास्त असावे.

पात्रता (Eligibility)

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी मशीनिस्ट, फीटर, वेल्डर, मेकॅनिकल डिझेल, मेकॅनिक मोटर व्हेईकल, इलेक्ट्रिशियनसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये किंवा आयटीआय सर्टिफिकेट असावे. याचसोबत ग्रॅज्युएट अप्रेंटिस केमिकल इंजियनरिंग, कॉम्प्युटर इंजिनियरिंग, बीबीए, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, मायनिंग इंजिनियरिंगमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी.

टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी संबंधित क्षेत्रात डिप्लोमा केलेला असावा.ज्यांचे नुकतेच शिक्षण झाले आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू १२ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. यासाठी तुम्हाला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट,BIOM, किरनदुल, कॉम्प्लेक्स, जिल्हा दंतेवाडा छत्तीसगड, एनएमडीसी लिमिटेड येथे जावे लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला NATS आणि NAPS वर अर्ज करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

Wednesday Horoscope : संकटातून यशस्वीपणे मार्ग काढाल; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार

Cyclone Montha: आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर १०० किलोमीटर स्पीडनं धडकलं चक्रीवादळ; 'मोंथा' नावाचा अर्थ काय?

Ladki Bahin Yojana: लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट, लाडकीसाठी वर्षाला 43 हजार कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT