NIT Recruitment Saam Tv
naukri-job-news

NIT Recruitment: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

NIT Recruitment 2024: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ज्युनिअर असिस्टंट ते टेक्निकल असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. एनआयटी मेघालयामध्ये ज्युनिअर असिस्टंट आणि टेक्निकल असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु केली आहे. या नोकरीसाछी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

एनआयटीच्या भरतीमध्ये टेक्निकल असिस्टंट पदासाठी १ जागा रिक्त आहेत. अधिक्षक पदासाठी १ जागा आणि टेक्निशियन पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. ज्युनिअर असिस्टंट पदासाठी २ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

टेक्निकल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बीटेक किंवा बीई पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असावी.

टेक्निशियन पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स शाखेतून पास असणे गरजेचे आहे. ज्युनिअर असिस्टंट पदासाठी उमेदवाराने १२ वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत टायपिंगचा कोर्स केलेला असावा.

https://www.nitm.ac.in/ या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. अर्ज करताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. एनआयटी मेघालय येथे ही भरती केली जाणार आहे. (NIT Recruitment 2024)

आरबीआयमध्ये इंटर्नशिप (RBI Internship)

सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये समर इंटर्नशिपसाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात इंटर्नशिप सुरु होणार आहे. मात्र, यासाठी तुम्हाला आताच रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT