NHAI Recruitment Google
naukri-job-news

NHAI Recruitment: भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ३९००० रुपये मासिक वेतन; अर्ज कुठे कराल? वाचा

NHAI Recruitment 2024: भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण विभागात भरती सुरु आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ३९००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

Siddhi Hande

भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी करायची आहे त्यांनी या नोकरीसाठी लगेचच अर्ज करावा. यासाठी तुम्हाला nhai.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. NHAI ने मॅनेजर पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी २६ जुलैआधी अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून कायद्याची पदवी प्राप्त केली असणे गरजेचे आहे.तसेच करार, नियमन प्रकरणे आणि भूसंपादन कायदा यामध्ये ५ वर्षाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय ५६ वर्ष असायला हवे. ५६ वयानंतरच्या उमेदवारांचचे अर्ज स्विकारले जाणार नाही.

NHAI भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना चांगले वेतन दिले जाणार आहे. त्यांना PB-3 रुपये १५६०० ते ३९१०० ग्रेड पे मासिक वेतन दिले जाईल. तसेच ६००० रुपये सातव्या वेतन आयोगानुसार दिले जातील. या नोकरीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायला हवे.

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर फॉर्मची हार्ड कॉपी ऑफलाइन पद्धतीने पाठवावी लागेल. डीजीएम (एचआर आणि प्रशासन)-III, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जी-५ आणि ६, सेक्टर- १० द्वारका, नवी दिल्ली येथे पाठवावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT