BMC Recruitment 2024 Google
naukri-job-news

BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महापालिकेत विविध पदांसाठी भरती; मिळणार ३०००० रुपये पगार; असा करा अर्ज

BMC Job Application: सरकारी नोकरी करण्याची स्वप्न असणाऱ्या लोकांसाठी ही खास माहिती. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

बृहन्मुंबई महागरपालिका अंतर्गत भरती सुरु आहे. लोकमान्य टिळक महानगरपालिका अंतर्गत रुग्णालयात लहान मुलांकरिता कुपोषण पुर्नवसन, संशोधन, प्रशिक्षण आरोग्य केंद्राकरिता रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. बालरोग चिकित्सा विभागात ही भरती करण्यात येणार आले. लोकमान्य टिळक माहनगरपालिका पदासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि लोकमान्य टिळक महानगपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. राज्य सरकारद्वारे ही भरती करण्यात येणार आहे. यामध्ये विविध जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५ हजार ते ३० हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात सांगितले आहे. १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. एका वर्षासाठी ही भरती करण्यात येणार आहे. यामध्ये परिचारिका, समुपदेशक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

परिचारिकासाठी उमेदवाराचे शिक्षण बी.एस.सी नर्सिंह, जीएनएम शिक्षण पूर्ण झालेले असावे. एकूण ३ रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. यासाठी २८ जून २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी तुम्ही लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वासाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात अर्ज पाठवू शकतात. याबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

SCROLL FOR NEXT