ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रसत्यावर अनधिकृत विक्रेत्यांकडून मिळणारे पेय आणि खाद्यपदार्थांमुळे तुम्ही आजारी पडू शकता त्यामुळे त्याचे सेवन करणं टाळा.
तुम्ही बाहेरच्या जेवणापेक्षा घरगुती आणि घरी बनवलेल्या पदार्थांचा अस्वाद घ्या.
उन्हाळा असल्यामुळे अन्न लवकर खराब होतं त्यामुळे रात्री बनवलेलं जेवणाचे सेवन करण शक्यतो टाळा.
मांसाहार सारख्या पदार्थांचे सेवन करण्यापुर्वी ते ताजे आणि स्वच्छ आहेत की नाही याची व्यवस्थित खात्री करून घ्या.
तुमच्या लहान मुलांना घरच्या घरी टेस्टी आणि पौष्टीक पदार्थ बनवून खायला घाला.
गर्भवती महिलांनी रस्त्यावरील जंक फुड खाणं टाळावे. हिरव्या भाजीपाला आणि फळे बाजारातून आणल्यानंतर मिठाच्या पाण्याने चांगले स्वच्छ करून घ्या
तुम्हाला उलटी, जुलाब, मळमळ व कावीळ या सारख्या समस्यांची लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.