MSRTC Recruitment Saam Tv
naukri-job-news

MSRTC Recruitment: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; एसटी महामंडळात ६८ पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

MSRTC Recruitment 2024: एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ६८ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. ६८ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (MSRTC Job)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात लिपिक, सहाय्यक, शिपाई आणि इलेक्ट्रिशियन पदासाठी रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

लिपिक, सहाय्यक, शिपाई पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास किंवा आयटीआय पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. याचसोबत डिप्लोमा झालेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. नुकतेच शिक्षण झालेल्या तरुणांसाठी ही नोकरीची संधी आहे. या नोकरीच्या कालावधीत तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येणार आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (MSRTC Recruitment)

याचसोबत सध्या इंडियन ओव्हसीज बँक, यूनियन बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. त्याचसोबत सणासुदीच्या दिवसात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहक जास्त प्रमाणात वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळेच जास्त कामगारांची गरज भासते. तसेच अनेक डिलिव्हरी अॅप्सना डिलिव्हरी बॉयची गरज असते. त्यामुळे या काळात हंगामी कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. त्यामुळे तुमच्यासाठी नोकरीच्या अनेक संधी येत्या काही दिवसात उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pithla Bhakri Recipe: पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी बनवा झणझणीत पिठलं-भाकरी

दहशतवाद्यांच्या आकांना आता झोप येत नसेल; पंतप्रतधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले? VIDEO

Ratnadurga Fort : रत्नदुर्ग किल्ल्याचे दुसरे नाव काय? 99% लोकांना नसेल माहिती

Kitchen Vastu Tips: किचनमधून आजच बाहेर काढा 'या' गोष्टी, पैशांची कमतरता होईल दूर

Maharashtra Live News Update: रांजणगावजवळ लोखंडी रोडने एसटी वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT