Government Job Google
naukri-job-news

MPPSC Recruitment: सरकारी विभागात नोकरीची संधी, पगार १.४ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा कराल?

MPPSC Food Safety Officer Recruitment: मध्य प्रदेश लोक सेवा आयोगाने फूड सेफ्टी ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. एमपीपीएससीने फूड सेफ्टी ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाने ही भरती जाहीर केली आहे. खाद्य सुरक्षा अधिकारी या पदासाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे.

चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही एमपीपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला जाऊन भेट द्यावी लागणार आहे. mppsc.mp.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करा. (MPPSC Recruitment)

अर्ज कधीपासून करता येणार?

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ११ जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे. तसेच फॉर्ममध्ये काही सुधारणा असेल तर १२ ऑगस्टपर्यंत करु शकतात.

पात्रता

फूड सेफ्टी अधिकारी पदासाठी ६७ जागा रिक्त आहेत.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे फूड टेक्नोलॉजी, डेअरी टेक्नोलॉजी, ऑइल टेक्नोलॉजी, कृषी विज्ञान, पशु चिकित्सा विज्ञान, जैव रसायन, सूक्ष्म जीव विज्ञान, केमिस्ट्री, पीजी किंवा डॉक्टरेट पदासाठी भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी १ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना ५०० रुपये शुल्क भरायचे आहे.

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा इंदोर, भोपाळ, जबलपूर, ग्वाल्हेर येथे परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखत घेतली जाईल. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३६,२०० ते १,१४,८०० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवरायांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा, युनेस्काच्या यादीत समावेश, जाणून घ्या नावे | VIDEO

Jai Shivaji : जय शिवाजी! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत, वाचा इतिहास| PHOTO

सावधान! दूधात तेल आणि चुना? तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध ? आमदारांनी डेमो दाखवला...कारवाई कधी?

Aeroplane Etiquette: टूथपेस्ट ते परफ्यूम... विमानात पायलटला कोणत्या गोष्टी नेण्यास बंदी असते?

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा आठवावा प्रताप! छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना UNESCO World Heritage दर्जा

SCROLL FOR NEXT