Mahavitaran Job Saam Tv
naukri-job-news

Mahavitaran Job: छ. संभाजीनगरच्या महावितरण विभागात नोकरीची संधी; अप्रेंटिस पदासाठी भरती, पगार किती?

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महावितरण कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे भरती सुरु आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी ही भरती करण्यात येणार आहेत. याबाबत अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

महावितरण छत्रपती संभाजी नगर कार्यालयात २७ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१४ आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची प्रत दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे. (Mahavitaran Sambhaji Nagar Recruitment)

ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिग्री/डिप्लोमा केलेला असावा. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे. ज्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे असे उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १८ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ८००० ते ९००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

महावितरण संभाजी नगरच्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज म.रा.वि.वि.कं.मर्या.विश्रामगृह,परिमंडळ कार्यालयाचा परिसर, छत्रपती संभाजी नगर येथे अर्ज पाठवायचा आहे. (Mahavitaran Job)

मुंबई महापालिकेत नोकरी (BMC Recruitment)

सध्या मुंबई महानगरपालिकेत वॉर्ड निरिक्षक पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठीदेखील तुम्ही अर्ज करु शकतात. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार महानगरपालिकेतील भरतीसाठी अर्ज करु शकतात. त्याचसोबत त्या व्यक्तीने MS CIT आणि टायपिंगचा कोर्स केलेला असावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची बांधण्यात आली पहिली सालंकृत पूजा

Badlapur BJP Meeting News : भाजपच्या बैठकीत गोंधळ, आमदार आणि माजी खासदारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? VIDEO

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते निवडणुकीच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना देणार तगडी फाइट

Operation Blunder : ती एक चूक जीने काँग्रेसला नवसंजीवनी दिली; काय आहे ‘ऑपरेशन ब्लंडर'? वाचा सविस्तर

Team India: भारताच्या नवदुर्गा! टीम इंडियाच्या रणरागिणी उंचावणार T-20 WC ची ट्रॉफी

SCROLL FOR NEXT