Mahatransco Recruitment Saam Tv
naukri-job-news

Mahatransco Recruitment: सातारा आणि सांगलीतील तरुणांसाठी खुशखबर; महाट्रान्स्कोमध्ये विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या सर्व डिटेल्स

Mahatransco Recruitment 2024: महाट्रान्स्कोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सातारा आणि सांगली विभागासाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाट्रान्स्को म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे. अनेक जिल्ह्यातील महाट्रान्स्को विभागात ही भरती करण्यात येणार आहे. ७७ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा.

महापारेषणअंतर्गत सातारा आणि सांगली जिल्ह्यात इलेक्ट्रिशियन अप्रेटिंस पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२४ आहे.

सातारा (कराड) जिल्ह्यातील विभागात ३९ जागा रिक्त आहेत तर सांगलीत ३८ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

१८ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत.mahatranso.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही.

याचसोबत सध्या उत्तर रेल्वे, कर्मचारी निवड आयोगात वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे ते उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. तसेच कर्मचारी निवड आयोगात तब्बल ३९००० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये विविध विभागात कॉन्स्टेबल पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सरकारी नोकरीच्या अनेक संधी आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT