Sahkari Bank Recruitment Google
naukri-job-news

Sahkari Bank Recruitment: महाराष्ट्र सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; दहावी- बारावी पास उमेदवारांसाठी भरती; असा करा अर्ज

Sahkari Bank Recruitment 2024: महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हाला बँकेत काम करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

Siddhi Hande

बँकेत काम करण्याची इच्छुक असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. महाराष्ट्र बँक लिमिटिडमध्ये नागरी सहकारी बँकेत अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीमध्ये शाखा व्यवस्थापक, संगणकीय अधिकारी, वसुली अधिकारी, शिपाई या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

दहावी- बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बँकिग क्षेत्रात पदव्युतर पदवी असणे गरजेचे आहे. तसेच व्यवस्थापकीय कामाचा किमान १० वर्षांचा अनुभव असावा. महाव्यवस्थापक (Senior Admisnistrator) या पदांसाठी देखील अर्ज मागवले आहेत. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापाठातून पदवी शिक्षण झालेले असणे गरजेचे आहे. एम.एस.सी.आय. टी पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. बँक किंवा इतर फायनान्स संस्थेमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर किमान ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

या भरतीमध्ये वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक, कर्ज अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तसेच संगणक अधिकारी (IT)या पदासाठीदेखील भरती आहे. यासाठी तुमच्याकडे B.C.S/B.E/B.Tec/M.C.S.M.C.A पदवी असणे गरजेचे आहे. याचसोबत मायक्रोसॉफ्ट, बँकिग क्षेत्रातील आयटी विभागात ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. याचसोबत शिपाई पदांसाठीदेखील भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी किमान उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असणे गरेजेच आहे. त्याला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. या पदांसाठी नोकरी अहमदनगर येथे आहे. इच्छुक उमेदवाराने श्री रुक्मिणी सहकारी बँक लि. श्रीगोंदा, मु. पोस्ट, सिटी प्राईड बिल्डिंग, दौंड- जामखेड रोड, तालुका श्रीगोंदा, जिल्हा- अहमदनगर ४१३ ७०१ या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT