Shreya Maskar
पावसात सावंतवाडी फिरण्याचा प्लान करत असाल तर, या ठिकाणांना आवर्जून भेट द्या आणि निसर्गाचे अलौकिक रुप पाहा.
सावंतवाडीला डोंगराळ भागाचे सौंदर्य पाहायला मिळते.
सावंतवाडीला आल्यावर शिरोडा आणि रेडी बीचला आवर्जून भेट द्या. गोव्याचा आनंद येथे तुम्हाला घेता येईल.
सायंकाळच्या मंद प्रकाशात या तलावाचे सौंदर्य वाढतच जाते. या तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
राजवाडा पॅलेस मोती तलावाच्या काठावर वसलेला सुंदर वाडा आहे. राजेशाही जीवनशैलीची झलक येथे पाहायला मिळते.
आंबोली हे छोटे गाव डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेले आहे. येथे तुम्हाला घनदाट जंगलातून जाण्याचा आनंद घेता येतो.
सावंतवाडीचे अद्भुत सौंदर्य तुम्हाला नरेंद्र डोंगरावरून पाहता येते. पावसात हा हिरवागार निसर्ग मनमोहक दृश्यांनी भरून जातो.
महादेवगड पॉइंट हा निसर्ग सौंदर्याचा एक उत्तम नमुना आहे. येथील सुंदर धबधबे पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.
शिल्पग्राममध्ये तुम्ही हस्तकला, लोककलेचे उत्तम नमुने पाहू शकता. तसेच येथे ग्रामीण जीवनाची जवळून ओळख होते.