Solapur Mahanagarpalika Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Government Job: दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या...

Solapur Mahanagarpalika Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ४० रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. १६ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

सोलापूर महानगरपालिकेत अप्रेंटिस, इलेक्ट्रिशियन, वायरमन,पंप ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर, मेसन/गवंडी, मोटार मेकॅनिक, प्लंबर अशा अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास आणि संबंधित ट्रेडमधून ITI पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठीचे ठिकाण सोलापूर आहे. (Jobs In Solapur)

https://www.solapurcorporation.gov.in/ या वेबसाइटवर याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना तुम्हाला अर्जासोबत सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

Birthday Gift Ideas: लहान मुलांच्या वाढदिवसाला देता येतील असे 5 रिटर्न गिफ्ट्स

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT