Health Department Job Saam Tv
naukri-job-news

Arogya Vibhag Bharti 2024 : आरोग्य विभागात २६०३ पदांसाठी कंत्राट भरती, विद्यार्थ्यांचा विरोध

Health Department Recruitment: राज्याच्या आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहेय २६०३ पदांसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

राज्याने नव्याने स्थापन केलेल्या आणि श्रेणीवर्धन आरोग्य संस्थासाठी नव्याने कुशल आणि काल्पनिक अकुशल पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. निवडणूकीपूर्वीच कंत्राटी भरतीचा अध्यादेश आरोग्य विभागाने जाहीर केला आहे.

राज्याच्या आरोग्य संस्थांमध्ये अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळेच पदनिर्मिती न करता संबंधित कामे बाह्य यंत्रणेकडून करायची आहेत. त्यामुळेच ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे.

शासनाचा निर्णय

राज्याने नव्याने स्थापन केलेल्या श्रेणीवर्धन आरोग्य संस्थांसाठी २६०३ जागा भरण्यात येणार आहे. ९३ विविध आरोग्य संस्थांमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. मनुष्यबळासाठी वार्षिक रुपये ५९,८७,३३००४ रुपये खर्च येणार आहे. ३ वर्षांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. सन २०२४-२५,२०२५-२६,२०२६-२७ साठीच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे.३ वर्षांसाठीच्या या खाजगीकरणाला मान्यता देण्यात आली आहे. २६०३ जागांवर भरती होणार आहे. मात्र, या कंत्राटी भरतीला पुण्यातील विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. मात्र, ही भरती कंत्राटी पद्धतीने होऊ नये, असं पुण्यातील विद्यार्थ्यांना वाटत आहे. २६०० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात वायू प्रदूषणाचा कहर; साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT